Type Here to Get Search Results !

CRIME NEWS लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

CRIME NEWS लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 
वडगाव निंबाळकर/बारामती 
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी भापकर (बोरघाट) येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व शस्त्रास्त्र कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील पीडित प्रथमेश उर्फ सोन्या जालींदर कांबळे (वय 28, व्यवसाय – शेती, रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक 27 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास लोणी भापकर बोरघाट येथील सोन्या आरडे यांच्या पोल्ट्री फार्मवर आरोपींनी जीव घेण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयत्याने त्यांच्या मान व डोक्यावर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी अभिषेक तात्या पवार, प्रथमेश जालींदर खोमणे, महेश भापकर आणि ओंकार उर्फ सोनू राजेश आरडे (सर्व रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 149/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 109, 61(2), 352, 351(2), 3(5), अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलमे 3(2)(V), 3(2)(VA), 6 तसेच शस्त्रास्त्र कायद्यातील कलम 4 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद 27 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6.14 वाजता करण्यात आली असून, पोलीस हवालदार खेडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कदम करीत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनीही भेट देऊन पाहणी केली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test