सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सर्वत्रच या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असून बाजरी पिकांना सध्या श्रावण सरी चालू आल्याने या वर्षीचे घेतलेले बाजरी पीक विहिरीच्या पाण्यावर न येता पाऊसावरच आले आहे.बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातही बाजरीचे पीक सध्या जोमात आले आहे. सध्या बाजरीची कणसे फुलोऱ्यात आली असल्यामुळे शेतकरी समाधानी आहे.
याच परिसरातील, भुईमूग, तूर, कांदे, मूग तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, हत्ती घास व कडवळ आदी पिकांना सध्या पावसामुळे चांगली वाढ झाली आहे.तर चालू असलेल्या पावसाने काही पिके जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बाजरीचे पीक हमखास येणार असल्याने एका बाजूला धान्याचा तर दुसऱ्या बाजूला जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
लोणीभापकर, वाकी, चोपडज, वडगांव निंबाळकर,होळ,करंजे,मगरवाडी, वाणेवाडी, मुरूम तसेच निंबुत आदी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीच पीक घेतले आहे.
*****************************
त्यामुळे धान्याबरोबरच जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. एकंदरीतच यावर्षी बाजरीचे पीक चांगल्या प्रकारे हाती लागणार आहे.आणि धान्याचा चंगला उतार मिळणार आहे आणि झालेल्या पावसाने बाजरीचे पीक फुलवऱ्यात असून ते तरारले आहे,
शेतकरी :- तात्यासो गायकवाड - मगरवाडी.