लोणीभापकर प्रतिनिधी
पदवीधर युवकांचा प्रश्नांसाठी लढा देण्यासाठी त्यांचे असणारे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका अध्यक्षपदी लोणी भापकर चे हेमंत रोहिदास गायकवाड यांची निवड करण्यात आली.यावेळी गायकवाड म्हणाले की, पदवीधर संघटनेच्यावतीने महाराष्ट्रभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याद्वारे सामाजिक प्रबोधन युवकांचा राजकारणात सक्रिय सहभाग यासाठी संघटना सातत्याने काम करत आहे पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुजित थिटे व प्रदेश उपाध्यक्ष अमित कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यातील युवकांच्या प्रश्नावर व संघटनेच्या सर्व उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊ असे म्हणाले.