सोमेश्वरनगर प्रतिनिधी
देवस्थान ट्रस्ट करंजे ने सोमेश्वर लाईव्ह वेबसाईट च्या माध्यमातून दिले दर्शन...
श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर करंजे याठिकाणी मंदिर व मंदिर परिसरात भाविक आपल्या शिवभक्त मुळे कळस आणि वेशीचे दर्शन घेऊन जात होते, शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत मंदिर व मंदिर परिसर देवस्थान ट्रस्टने बंद केलेला आहे. यासाठी सोमवारी दि १० रोजी वडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तही दिवसभर ठेवण्यात आला होता . को रोना चा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात येऊ नये . उगाच गर्दी करु नये आणि आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी यासाठी घरी राहून दर्शन घ्या असेही आव्हाहन केले.भाविकांच्या सोईसाठी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घरी बसून दर्शन घेण्यासाठी लाईव्ह दर्शन ची वेबसाईड तयार केलेली आहे , सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रसारितही केली असल्याची माहिती अध्यक्ष विनोद भांडवलकर व सचिव सुनील भांडवलकर यांनी दिली .
महाराष्ट्रातील शिवभक्तांनी या वेबसाईटचे स्वागत करत अभिनंदन हि केले आणि समाधान व्यक्त केले .