Type Here to Get Search Results !

बावडा येथे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते गणरायाची आरती

इंदापूर प्रतिनिधी
विघ्नहर्ता गणरायाने कोव्हिडचे निर्मुलन करून जनतेला दिलासा देण्यासाठी साकडे 
 
बावडा येथील श्री शिवाजी तरुण मंडळाच्या गणेश मूर्तीची आरती गुरुवार , दि. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी नीरा भीमा कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली . यावेळी विघ्नहर्त्या गणरायाने कोव्हिडचेे  निर्मूलन करून जनतेला दिलासा द्यावा , असे साकडे गणरायाला राजवर्धन पाटील यांनी घातले .

चालू वर्षी कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शिवाजी तरुण मंडळाने बाजारतळावर सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना न करता , वर्षभर गणेश मूर्ती ठेवलेल्या ठिकाणीच साधेपणाने सजावट करून गणेशोत्सवानिमित्त दररोज गणेश मूर्तीची विधिवत पूजा उत्साहात केली जात आहे . मंडळाच्या या साधेपणाचे राजवर्धन पाटील यांनी कौतुक केले . याप्रसंगी मंडळाचे युवक कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test