बारामती प्रतिनिधी
बारामतीत वाढत्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दुष्टीने बारामतीत 'जनता कर्फ्यू' लागू करण्यात आला आहे.या कर्फ्यू दरम्यान विना मास्क, विनाकारण दुचाकी, चारचाकी वाहनातून फिरणे, तसेच बेकायदेशीर दारू व्यवसायावर कारवाई करत ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या ३ दिवसात तब्बल ४ लाख ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये बारामती शहर, बारामती तालुका, बारामती वाहतूक शाखा,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यासह बारामती आरटीओ ने ८४ वाहनांवर कारवाई करत तब्बल १ लाख ५४ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे
टाळेबंदी दरम्यान बारामती 'पॅटर्न' ची यशस्वी अंमलबजावणी करून अवघ्या काही दिवसातच बारामती कोरोना मुक्त झाली. खरी मात्र तद्नंतर बारामतीत नियम शिथिल करण्यात आले. व बारामती पुन्हा गर्दीने गजबजू लागली. परिणामी नियमांचे पालन न केल्यामुळे व गर्दीमुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. सध्या दिवसाकाठी शंभराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात 'जनता कर्फ्यू' लागू करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस बारामतीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणा शिवाय घराबाहेर पडू नये, मास्क व सँनीटायझरचा नियमित वापर करावा. नागरिकांनी 'जनता कर्फ्यू' दरम्यान प्रशासनाला सहकार्य करावे. अन्यथा नियम मोडणार्यांवर कडक कारवाई सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
*******************************************
बारामतीतील कोरोनाची संसर्गाची परिस्थिती पाहता 'जनता कर्फ्यू' दरम्यान नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. विनाकारण दुचाकीवरुन फिरताना आढळून येत आहे. त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. माञ यापुढे विनामास्क व विनाकारण रस्त्यांवर फिरणा-यांवर गुन्हे दाखल करणार आहे.
नारायण शिरगावकर- बारामती.उपविभागीय पोलिस अधिकारी



