बारामती तालुक्यातील आणखी ८५ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लावाला असतानासुद्धा कोरोनाची वाढ होत आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.दिनांक ११/०९२० चे प्रतीक्षेत असलेले ५६ नमुन्यांपैकी १० जण पॉझिटिव्ह आले आहेत. काल दिनांक १२/०९/२० रोजी एकूण rt-pcr २३८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी एकूण ३५ जण पॉझिटिव्ह आले असून प्रतीक्षेत ० आहेत. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण ० आले आहेत. तसेच काल एकूण एंटीजन १६७ नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी पॉझिटिव्ह- ४० आले आहेत.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०+३५+४० असे एकुण ८५ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत . यामध्ये शहरातील ४४ व ग्रामीण भागातील ४१ रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या २०५५ झाली असून एकूण बरे झालेले रुग्ण ९७१ झाले आहेत. तसेच एकूण मृत्यू ५५ झाले आहेत.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.



