लोणी भापकर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पळशी अंतर्गत असणाऱ्या कोळेकर वस्तीचा गावाशी संपर्क तुटला असून, वस्ती ते गाव असा जोडणारा ओढ्यावरील बंधारा जोरदार पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गावांमध्ये येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे, त्याचप्रमाणे पाऊस जोरात झाल्याने तेथील काही घरांची पडझडही झाली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने वस्तीवरती जाऊन पंचनामे करण्यात आले.
यावेळी ग्रामसेविका दीपाली हिरवे, उपसरपंच संदीप कोळेकर व काही ग्रामस्थ उपस्थित होते.



