स्व.पोपटनाना थोरात यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलताना माजी आमदार रमेश थोरात
केडगाव प्रतिनिधी मानसिंग रुपनवर...
जीवन जगत असताना आपण समाजाचे देणे लागतो त्यामूळे समाजाच्या हितासाठी काम करणे आवश्यक असते स्व. पोपटनाना म्हणजे समाजासाठी झटणारा आधारवड होय असे मत दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
खुटबाव ता. दौंड येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. पोपटनाना थोरात यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर बाजार समितीचे संचालक उत्तम ताकवले संस्थेचे व्हा. चेअरमन भाऊसो ढमढेरे संचालक अरुण थोरात जी के थोरात सचिव सुदाम भापकर माजी सरपंच शिवाजी थोरात शरद शेलार न्यानदेव कदम प्राचार्य अविनाश सांगोलेकर कोंडीराम थोरात दिगंबर थोरात राजेंद्र थोरात आणि इतर मान्यवर उपस्थित होते रमेश थोरात पुढे म्हणाले माणुस किती जगला यापेक्षा तो कसा जगला हे अत्यंत महत्वाच आहे पोपटनाना शिस्तबद्ध होते परंतु भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या उभारणीत त्यांचे कार्य मोलाचे आहे परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी या संस्थेचे रोप लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष झाला आहे परंतु हे पाहण्यासाठी ते आपल्यात नाहीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये एकूण १६८० स्पर्धकांनी भाग घेतला प्रास्ताविक प्राचार्य हिंदूराव जाधव यांनी तर सुत्रसंचालन मानसिंग रुपनवर यांनी केले.



