दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्याकडे मागील वर्षीच्या सर्व थकीत एफ आर पी ची रक्कम ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खातेवर जमा केल्या शिवाय कुठल्याही कारखान्याला गाळप परवाना देण्यात येवू नये असे निवेदन साखर आयुक्त याना भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा सरचिटणीस वासुदेव काळे यांनी दिले आहे या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की गेल्या वर्षी च्या गाळपा आलेल्या ऊसाची एफ आर फी ची रक्कम महाराष्ट्र तील सर्व शेतकरी यांच्या बँक खाते मध्ये जमा करावी असा आदेश साखर आयुक्त यांच्या मार्फत काढण्यात यावा अन्यथा किसान मोर्चे अध्यक्ष जर रक्कम जमा नाही झाली तर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करून साखर आयुक्तच्या कार्यलयाला टाळे टोकण्यात येईल असा इशारा या निवेदना द्रवारे देण्यात आला आहे या निवेदनावर गणेश भेगडे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात धर्मद्र खंडारे माऊली शेळके माऊली चवरे संजय घुडरे केशव कामठे काकासाहेब खळदकर यांच्या सह्या आहेत



