Type Here to Get Search Results !

बावडा लाखेवाडी गटामध्ये पोषण आहाराची फलकाद्वारे केली जनजागृती


इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुपोषणमुक्त भारत साठी "पोषण अभियान" हा  महत्वकांक्षी कार्यक्रम सध्या राबविण्यात येत  आहे . बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये या मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व सांगणारा माहिती फलकांच्या माध्यमातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती  करण्यात येत आहे.
           दि.१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशभर ‘राष्ट्रीय पोषण महिना’ साजरा करण्यात येत आहे . या कालावधीत कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे . बावडा , लाखेवाडी ,बोराटवाडी , चाकाटी , पिठेवाडी , निर-निमगाव , कचरवाडी , सराटी , लुमेवाडी , गोंदि , ओझरे , गिरवी , पिंपरी बु,. नृसिंहपुर , भोडणी , वकिलवस्ती , सुरवड , शेटफळ-हवेली , भांडगाव व परिसरातील सर्व ग्रामपंचायती व आरोग्य सेविका , डाॅक्टर यांच्या माध्यमातून जनजागृती अभिमान राबविण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test