Type Here to Get Search Results !

सावधान:एकत्रित पाच पेक्षा ज्यास्त लोकांवर होणार गुन्हे दाखल : API सोमनाथ लांडे

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील पश्चिम भागात कोरोना चे वाढते रुग्ण लक्षात घेता रविवार दि  १३ पासून पाच पेक्षा जास्त   असणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आव्हाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी  केले आहे
    तालुक्यातील कोरोना बाधित संख्या  दोन हजारांचा टप्पा पार केला आहे  याचे गांभीर्य लक्षात घेता कोणीही  विनाकारण घराबाहेर पडू नका  सतत सर्वांनी मास्क वापर करा प्रशासनाला मदत करा  असे वारंवार सूचना करूनही नागरिकांना गांभीर्य राहिले नाही ,गाव चौकात  तसेच सार्वजनिक ठिकाणी बिनधास्त नागरिक फिरत असल्याच्या तक्रारी सुज्ञ नागरिक करत असतात .

प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांकडून  झाले असते तर पोलिसांनी कारवाई करण्याची वेळच येणार नसती असेही लांडे बोलताना म्हणाले.
बिगर मास्कचे घरा बाहेर पडू नका,सोशल डिस्टन्स पाळा, गर्दीचे ठिकाणे टाळा हे पाळले तर कोरोणाची साखळी नक्की तुटेन व कोरोनाचा प्रसारही होणार नाही. कोणताही आजार झाला तर लगेच तपासणी करा असेही त्यांनी बोलताना सूचना केल्या .

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या
गावातून पाच पेक्षा अधिक लोक ज्या ठिकाणी दिसतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे , त्यामुळे विनाकारण कोण्हीही घरा बाहेर पडू नाका त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल  करण्यात येणार आहे.
--- सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे --

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test