Type Here to Get Search Results !

शुक्रवारी मध्यरात्रीपासून इंदापूर तालुका व शहर लाॅकडाऊन


इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले 

शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रात्री १२ वाजल्यापासून २० सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत इंदापूर तालुका व शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यमंत्रीदत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यापारी, नागरिक व पदाधिकारी यांच्या समन्वय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

यामध्ये दूध विक्री सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. इमर्जन्सी मेडिकल सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत .तसेच इंदापूर शहर हद्दीत सर्व रस्ते सील करून शहरात प्रवेश बंद केला जाणार आहे. 

इंदापूर तालुक्यातील शहर व ग्रामीण भाग पूर्णपणे ७ दिवस कडक लाॅकडाऊन करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले .

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे , तहशिलदार सोनाली मेटकरी , राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर , इंदापूर शहराच्या  नगराध्यक्ष अंकिता शहा , गटविकास अधिकारी विजयकुमार परिट , प्रभारी वैद्यकीय अधिकारी एकनाथ चंदनशिवे, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर , इंदापूर तालुका शिवसेना अध्यक्ष नितीन शिंदे, व्यापारी , नागरिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test