Type Here to Get Search Results !

बारामतीच्या जिरायती भागातील तलाव १०० टक्के भरले

 
लोणी भापकर प्रतिनिधी

बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्टयात ह्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला असून या परिसरात असणारे सर्व  तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
या परिसरात असणारा वाकीचा पाझर तलाव, मोढवे येथील पुरंदरे पाझर तलाव,  लोणी भापकर येथील खासबाग, पळशी येथील म्हानवरकीचा पाझर तलाव असे अनेक गावातील महत्वाचे पण अनेक वर्षांपासून न भरलेले पाझर तलाव या आठवड्यात भरून वाहत आहेत. त्यामुळे सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याने ओढ्यांना पूर आले आहेत. यामुळे या काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
  बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम जिरायती पट्ट्यातील शेती सिंचनाचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर कायम भेडसावत असतो, या पावसाने यावर्षीचा का होईना पाणी प्रश्न सुटणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test