Type Here to Get Search Results !

निरा-बारामती रस्त्यावर प्रवाशांची काळजी घेत धावते रोज लालपरी

********************************************

लवकरच स्वमालकीच्या काही शिवशाही बस आगार ताफ्यामध्ये दाखल होणार असून ते पुणे , मुंबई  अश्या धावताना दिसणार.

********************************************

सोमेश्वरनगर प्रतिनिधी विनोद गोलांडे...

सध्या जगात कोरोणाने हाहाकार  असताना प्रवाशांची या लाल परी प्रवास करायचा का नाही याची धास्ती घेतली होती .
   सामान्य नागरिक लालपरी प्रवास हा जीव धोक्यात चा असल्या  गैरसमजा मुळे जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावर होते , मध्यंतरीच्या  काळात तर या महामंडळावर अतिशय बिकट परिस्थिती आल्यामुळे त्यांनी मालवाहतूक बस अशी ही सेवा सुरू केल्याचे आपल्याला निदर्शनात आले होते , परंतु सध्या लाल परी आपल्या सेवेसाठी तत्पर झाली असल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक  , नोकरदार वर्ग व सामान्य अशा कुटुंबीयांना ही रस्त्यावर धावल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे , सध्या निरा-बारामती या मार्गावर रोजच्या  14 फेऱ्या लाल परीच्या होताना दिसत आहे,  नीरा-बारामती एस टी  ही सेवा महामंडळाकडून सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत असल्याने ज्येष्ठ नारी ज्येष्ठ नागरिक , नोकरदार वर्ग व गरजू कुटुंबांना याचा लाभ होताना दिसत आहे.
 
विशेष काळजी म्हणून एस टी महामंडळ बारामती यांनी नीरा डेपो आणि मुख्य बारामती बस स्थानक यावर आलेल्या निरा-बारामती बसचे प्रत्येक फेरी आल्यावर त्या बसची नीरा येथे एक कर्मचारी व बारामती बस स्थानकावर दोन कर्मचारी स्वतंत्र असे  असून आलेल्या बसला पूर्ण सॅनिटायझर करत पुर्णतः निर्जंतुकीकरण करत असून प्रवाशांची  काळजी घेत असल्याचे आगारप्रमुख यांनी  बोलताना सांगितले .

रोजच्या नोकरी, कामानिमित्त तसेच इतर गरजांसाठी निरा , सोमेश्वरनगर  वडगाव निंबाळकर  को-हाळे, माळेगाव ,पणदरे या गावं ठिकाणाहून रोजच्या गरजू प्रवाशांना बारामती तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे कोणीही अवैदिक असणारा प्रवास टाळावा व सुरक्षित असणारा एस टी महामंडळाचा प्रवास करावा असे आवाहन केले.

...बारामती आगारप्रमुख अमोल गोंजारी....


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test