Type Here to Get Search Results !

सोमेश्वरचा बॉयलर अग्नी प्रदिपनचा समारंभ रविवार होणार:कार्यकारी संचालक राजेंद्र यादव

सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ५९ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नि प्रतिपन समारंभ रविवार(दि.४) रोजी सकाळी साडेनऊ वाजता कारखाना कार्यस्थळावर पार पडणार आहे.सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या पत्नी रोहिणी पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते अग्नि प्रतिपन समारंभ पार पडणार असून सद्या कोविड चा प्रादुर्भाव असल्याने हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्यात पार पडणार आहे. दर वर्षी सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत असतो मात्र कोरोरणाच्या पार्श्वभूमीवर  सर्वांनाच उपस्थित राहणे शक्य नसले तरी आपल्या शुभेच्छा नेहमी कारखान्यासोबत राहतील.असे उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर आणि कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test