दौंड प्रतिनिधी राहुल अवचट
वातावरणातील बदलामुळे निर्माण झालेले कमी दाबाचा पट्टा आणि यामुळे देऊळगावराजे सह परिसरात बुधवारी सायंकाळी रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली ,देऊळगावराजे येथे १४०मिमी पाउसाची नोंद झाली आहे,एका वेळेस एवढा पाऊस होण्याची ही पहिलीच वेळ आहे,आजपर्यंत देऊळगावराजे येथे ७७४मिमी पावसाची नोंद झाली आहे,देउळगाव सह वडगाव पेडगाव ,शिरापूर, आलेगाव, हिंगणी ,काळेवाडी,बोरिबेल , मलठन परिसरात जोरदार
हजेरी लावली आहे.
या पावसामुळे परिसरातील शेतीचे ,घरांचे मोठे नुकसान झाले आहे,शेतीला तळ्याचे स्वरूप आले असून शेतातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, शेताचे बांध फुटले असून बऱ्याच ठिकाणी माती वाहून गेली आहे, अनेक लोकांच्या घरात पाणी घुसल्याने रात्र जागून काढण्याची वेळ आली.परिसरातील ओढे -नाले तुडूंब भरून वाहत आहेत सोयाबीन, बाजरी, कांदा, नवीन ऊस लागवड, चारा पिके, डाळिंब, तरकारी पिके याचे मोठे नुकसान झाले , साखर कारखानेआता सुरू होणारअसल्याने काही ऊसतोडणी मजूर दाखल झाले आहेत, त्यांना पक्का निवारा नसल्याने रात्र जागून काढावी लागली, आणि ऊस देखील किमान पंधरा दिवस तरी तोडता येणार नाहीत. आडसाली ऊस देखील या पावसामुळे लोळले आहेत परिणामी एकरी उत्पन कमी होणार आहे.वेचनीला आलेला कापूस पिकाचे मोठे नुकसान या पावसाने होणार आहे,तरी महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.