सोमेश्वरनगर प्रतिनिधी
लोकनेते दौलत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार क्रांती संघटना बारामती तालुका यांच्या वतीने
रामोशी-बेरड या जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करणे व इतर मागण्याबाबत
गुरुवारी दि ८ रोजी बारामतीचे नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले...
प्रशासनाचे उल्लंघन न करता तसेच कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर सर्वांनी मास्क,सॅनिटायजर व सुरीक्षित अंतर ठेवून सर्व नियमांचे पालन करून निवेदन दिले.
याप्रसंगी जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने , कालिदास खोमणे , सागर खोमणे, बारामती तालुका अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष नितिन माकर ,महेंद्र भंडलकर,.आप्पासाहेब भंडलकर,. रविंद्र जाधव , चांगदेव भंडलकर , ऋषिकेश खोमणे, स्वप्नील खोमणे, रणजित माकर , निलेश माकर , शेखर माकर,
इत्यादी पदाधिकारी व समाज बांधवांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले...
गेल्या पाच वर्षांपासून बेरड व रामोशी समाजाच्या मागण्या बाबत लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चे काढण्यात आले होते..या मोर्चात ही मागणी होती.
......................................................................
त्यावेळी शासनाच्या वतीने आरक्षण देण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते परंतु याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हे आंदोलन आम्ही छेडत असून २० दिवसात मागनीचा विचार न झल्यास आंदोलन पुन्हा पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा जय मल्हार क्रांती संघटचे
पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने यांनी दिला...



