मुंबई, प्रतिनिधी
नालासोपारा येथील शिवसैनिक ओम जंगम यांच्या बंधूंचे कोरोनाने निधन झाले. यानंतर "शिवसेना न्युज कमेंन्ट आर्मी" या व्हाटसॲप समुहाने पुढाकार घेत शिवसैनिकांना मदतीसाठी साद घातली होती. शिवसैनिकांनी भरभरुन प्रतिसाद देत जवळपास ५७ हजार रुपये जमा करून जंगम यांच्या कुटुंबाला मदत केली.
यावेळी शिवसैनिक शिवराम भोजने, केसरीनाथ पाटील, सुदाम शिनगारे, नामदेव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकेश फुंडे, जालिंदर कोपनबैने, रावसाहेब पाटील, अक्षय ठाकुर, शरद क्षिरसागर, ऋषिकेश इंगळे, केतन मोरे, विशाल फुलसुंदर आदि शिवसैनिकांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.
Nice
ReplyDelete