Type Here to Get Search Results !

बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप बापू धापटे यांनी दरवर्षीप्रमाणे ऊसतोड मजुरांना कपडे व खाऊ वाटप..



बारामती प्रतिनिधी

बारामती पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप बापू धापटे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. दरवर्षीप्रमाणे आजही प्रदीप (बापू) धपाटे मित्र परिवाराच्या वतीने ऊसतोड मजुरांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. 
      प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराच्या वतीने गेली अठरा ते वीस वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. आठ दिवसापूर्वी विजयादशमीच्या मुहूर्तावर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाला असून कोराळे बुद्रुक परिसरात अनेक ऊसतोड मजूर बीड, नगर जिल्ह्यातून दाखल झाले आहेत. जन्मताच कष्टाचा विडा उचललेल्या या मजुरांना दरवर्षी काही ना काही मदत करण्याचा मानस प्रदीप बापू धापटे मित्र परिवाराचा असतो. त्याच अनुषंगाने आज प्रदीप बापूंच्या शेतात ऊसतोड कामगारांना व त्यांच्या मुलांना कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. ऊसतोड कामगारांचे हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे तसेच ऊस तोड करताना  संपूर्ण अंगभर कपडे घालता यावे हाच यामागचा उद्देश असल्याचे मत या कार्यक्रमावेळी उपसभापती प्रदीप बापू धापटे यांनी व्यक्त केले. यावेळी बापूंच्या सामाजिक कार्याचा थोडक्यात आढावा प्रमोद पानसरे यांनी घेतला. तसेच आशा प्रकल्पाचे तुषार जाधव व अजित खोमणे यांनीही अशा प्रकल्पाविषयी ऊसतोड मजुरांना माहिती देत मुलांना शाळेत पाठवण्याचं आवाहन केले. ऊसतोड मुकादम अनिल राणे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी रामदास धापटे (सर), धनंजय पडवळ, संभाजी जाधव, दत्ता नलवडे,विनोद गाडे, सागर गाडेकर,अशोक कदम, बन्सी पानसरे, साहिल शिरसागर, योगेश साळुंखे, लखन कोंढाळकर, यांच्यासह  मित्रपरिवार उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test