दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी टाळा;कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही:डॉ मनोज खोमणे
मुख्य संपादक - विनोद गोलांडेNovember 01, 2020
0
बारामती प्रतिनिध
सर्व बारामतीकरांना आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रूग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी सुद्धा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही तसेच सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत त्यामुळे गर्दीचे प्रमाण वाढत आहे तरी सर्व नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसींग पाळावे तसेच दुकानदारांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व आपले शहर कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती