Type Here to Get Search Results !

दिवाळीच्या तोंडावर भरधाव मालवाहतूक गाडीने धडक दिल्याने तुषार शिरसट याचा मृत्यू ...


वालचंदनगर प्रतिनिधी अमोल रजपूत

रणगावहून वालचंदनगर मार्गे जाणाऱ्या पांढव्या रंगाची  छोटा हत्ती मालवाहतूक गाडी ने   वालचंदनगर कंपनीतील कामगाराला धडक दिल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे वालचंदनगर  येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तो मृत्युमुखी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 शिरसटवाडी येथे राहत असलेल्या व वालचंदनगर कंपनीतील   तुषार रामदास शिरसट ( वय ३२ वर्षे )  हा दुचाकीवरून (गाडी नंबर एम एच १४ ए पी ९७७३ ) कंपनीत सकाळची पहिली शिप सुटल्यानंतर वालचंदनगरहुन रणगाव मार्गे  ३ वाजून २० मिनिटांनंतर घरी जात असताना त्याला रणगावकडून वालचंदनगर कडे येणाऱ्या एका पांढरया रंगाची छोटा हत्ती मालवाहतूक याने 
समोरून जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला,पायाला गंभीर मार लागल्यामुळे रक्तस्राव सुरू झाला.त्याला स्थानिक नागरिकांनी व कामगारांनी   खाजगी दवाखान्यात दाखल केले मात्र जोरदार धडकेने  शिरसट यांचा मृत्यू झाला. ऐन दिवाळीच्या तोंडावर मालवाहतूक याने  धडक दिली त्यात शिरसट याचा मृत्यू झाला.  गाडी भरधाव वेगाने निघून गेली.

फोटो ओळी:- वालचंदनगर  रणंगाव  जाणार्या  रोडने साळुंखे वसती  रस्त्यावर पांढरा छोटा हत्ती टमटम याने  जोरदार धडक दिल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test