पुरंदर प्रतिनिधी सिकंदर नदाफ
कत्तल करण्याच्या उद्देशाने ५ जनावरांना विना परवाना पिकअपमधून घेऊन जाणाऱ्या दोघांना वाल्हे पोलिसांकडून अटक करण्यात आली .सदरची घटना शनिवारी ( ता.२१ नोव्हेंबर )सायंकाळी साडे चारच्या सुमारास निरा रेल्वे स्थानकाजवळ घडली .
प्रशांत सुरेश रेवडीकर ( वय ३४ रा.शिरवळ ता.खंडाळा ) यांनी या प्रकरणी वाल्हे पोलीस चौकीला फिर्याद दिली.त्यानुसार राहुल मारुती वाघमोडे (वय २६ )व दत्तु मारुती वाघमोडे ( दोन्ही रा.सिरसटवाडी ता.इंदापूर )यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पांढऱ्या रंगाच्या पिकअप ( जिप क्र. एम.एच.४२ /एम./८७३६ ) मधून १ मोठा बैल व ४ खोंडे अशी ६८ हजार किमतीची एकूण ५ जनावरे निर्दयतेने व कत्तलीच्या उद्देशाने जेजुरीहून निरेच्या दिशेने विना परवाना जात होते.त्यावेळी प्रशांत रेवडीकर यांनी आपले मित्र सुरज भगत ( रा.वडकी नाला,हवेली ) व दिपक गोरगल ( रा.झेंडेवाडी, पुरंदर ) यांच्या मदतीने त्यांना निरा रेल्वे स्थानकावर अडवले होते.
या प्रकरणाचा अधिक तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार केशव जगताप, संदिप मदने, समीर हिरगुडे यांसह संदिप मोकाशी हे करित आहेत.



