स्थापना १ नोव्हेंबर १९९२ व २८ वा वर्धापण दिवस!
बारामती प्रतिनिधी
महात्मा फुले समता परीषदेचे कार्य संपुर्ण भारत वर्षात नेणार्या व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले,शाहू महाराज, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी जनमाणसात सामाजिक समता, आणि अन्यायाचा संविधानिक पध्दतीन संघर्ष करणार्या समता सैनिकांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.छगनरावजी भुजबळ साहेब (अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनानुसार यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, पुणे जिल्हा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थी विद्यार्थींनींचा, शैक्षणिक साहित्य देवून,सन्मान करण्यात आला!
यावेळी ग्रामपंचायत माळवाडी, बारामती येथील सभागृहामधे उपस्थित समता परिषद पुणे जिल्हाध्यक्ष मा.अनिल लडकत , महिला जिल्हाध्यक्षा मा.ज्योती झुरंगे , जिल्हा उपाध्यक्ष मा. रोहिदास कुदळे , तंटामुक्त अध्यक्ष मा. दत्तात्रेय लोणकर , बारामती तालुका अध्यक्ष मा. सचिन भुजबळ तसेच राजे प्रतिष्ठान बारामती तालुका अध्यक्ष मा. अतुल ढम, ग्रामसेवक सौ रुपाली लोणकर , पोलिस पाटिल सौ कल्पना लडकत तसेच प्रा. दादा लोणकर , माउली लोणकर , दिगंबर लोणकर , राहुल जगताप , अंकुश लोणकर आदि यावेळी उपस्थित होते.



