Type Here to Get Search Results !

रामोशी बेरड समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा : दुसऱ्या टप्प्यातील बोंबाबोंब आंदोलन.



बारामती प्रतिनिधी

बारामती तहसील कार्यालय  समोर लोकनेते दौलत  शितोळे  याच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार क्रांती संघटना बारामती तालुका  यांच्यावतीने
रामोशी बेरड समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा व इतर मागण्या बाबत "दुसऱ्या टप्प्यातील बोंबाबोंब आंदोलन " ...  जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने  यांच्या नेतृत्वाखाली  करण्यात आले .यावेळी बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधव उपस्थित होते.
बारामती चे  नायब तहसीलदार  महादेव भोसले
यांनी हे निवेदन स्वीकारले.

    यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशन चे गोपनीय चे  सिताप साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता ...
कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले.

बोंबाबोंब आंदोलन च्यावेळी खालील घोषणा देण्यात आल्या
आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो,शूरविर बहिर्जी नाईक यांचा विजय असो,बेडर कन्नपा यांचा विजय असो,रामोशी बेडर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे,आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा,आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे,रामोशी, बेरड,बेडर,विकास आराखडा तयार झालाच पाहिजे,जय मल्हार क्रांती संघटनेचा विजय असो,रामोशी ,बेरड समाजाला ST मध्ये समावेश झालाच पाहिजे अश्या घोषणाही दिल्या ...



यावेळी प्रमुख उपस्थिती
पुणे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब मदने,युवक उपाध्यक्ष किरण खोमणे,महेश जाधव,रविंद्र जाधव,सागर खोमणे,नवनाथ मदने,महेंद्र भंडलकर,आप्पा भंडलकर,ऋषी खोमणे,विकास  भंडलकर,निलेश भंडलकर,पप्पु चव्हाण,अशोक चव्हाण,माऊली मदने,निखिल मदने,पांडा घळघे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..

जर सरकार ने येणाऱ्या आगामी काळात आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही केल्या तर लोकनेते दौलत  शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महारास्ट्रातील सर्व आमदार,खासदार यांच्या निवासस्थाना समोर हे बोंबा बोंब आंदोलन खुप मोठ्या प्रमाणात करण्यात येईल असा इशारा. तसेच
 महाराष्ट्र त रामोशी व बेरड समाजाची लोकसंख्या जवळपास ५० ते ६० लाख इतकी आहे . पण गेली अनेक वर्षे हा समाज शैशिणीक आर्थिक सांस्कृतिक दृष्टया मागास असून शासनाच्या विकासात्मक व कल्याणकारी योजनांपासून वंचीत आहे.या समाजाचा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करावा. यासाठी आज बोंबाबोंब आंदोलन छेडल्याची माहिती 

पुणे जिल्हा अधक्ष्य नानासाहेब मदने यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test