Type Here to Get Search Results !

बारामती तहसीलच्या महसूल अधिकारीपदी महादेव भोसले यांची नियुक्ती



बारामती/ प्रतिनिधी : बारामती तहसील कार्यालयातील सांगायो नायब तहसीलदार महादेव अण्णा भोसले यांची महसूल नायब तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे.  पुणे विभागातील पुणे,सांगली,कोल्हापुर,सोलापूर,सातारा या जिल्ह्यातील  महाराष्ट्र शासन कार्यासन अधिकारी यांनी नायब तहसीलदार संवर्गातील  एकुण १४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनियतकालिक बदल्या केल्या आहेत. त्यानुसार महादेव भोसले यांची बारामतीच्या तहसील कार्यालयातमध्येच महसूल अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. तर भोसले महसूल विभाग सांभाळत संजय गांधी निराधार योजनेचे अतिरिक्त अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहेत. महसूल अधिकारी पदी नियुक्ती झाल्या बाबत बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील,तसेच प्रशासकीय भवन मधील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने महादेव भोसले यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गेली चार वर्षांपासून भोसले यांनी संजय गांधी निराधार योजनेसह, पुरवठा विभागाचे कामकाज उत्कृष्टरित्या पार पाडले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची बारामतीच्या महसूल नायब तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल विभागात सातबारा नोंदणी संदर्भातील सर्व कामकाज, संगणकीकरण, वसुली, गौणखनिज वसुली या संदर्भातील महसूल विभागाअंतर्गत सर्व कामकाज भोसले  पाहणार आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे अतिरिक्त म्हणून पदभार देखील सांभाळणार आहेत. गेली चार वर्षांत भोसले यांच्या कालावधीत संजय गांधी निराधार योजने अंतर्गत २ हजार ८१८ प्रकरणे मंजूर केली आहेत. तर श्रावण बाळ योजनेची १ हजार ७०५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. तर इंदिरा गांधी योजनेची १०४ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. अशी एकूण ४ हजार ६२७ लाभार्थींची प्रकरणे मंजूर झाली आहेत.

कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन वी.पो.थोरात यांनी या संदर्भात पुणे विभागात बदलीचे आदेश काढले आहेत. यामध्ये बारामती मधुन महादेव भोसले यांची बारामती तहसील कार्यालयात महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष सोनावणे नायब तहसीलदार, वाई (जि. सातारा) यांची मावळ येथे निवडणूक नायब तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. प्रकाश आरगे निवडणूक नायब तहसीलदार, करवीर (जि. कोल्हापूर) यांची शिरोळ ( जि. कोल्हापूर ) येथे बदली करण्यात आली आहे.
एस.सी.परदेशीमठ, महसूल नायब तहसीलदार, मंगळवेढा यांची जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे बदली करण्यात आली आहे. सीमा अरुण सोनवणे, नायब तहसीलदार रोहयो, (जि. सोलापूर) यांची वाळवा जि.सांगली येथे बदली करण्यात आली आहे. अंकुश इवरे, सांगायो नायब तहसीलदार माण, (जि. सातारा) यांची फलटण (जि. सातारा ) येथे नायब तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे.  अनिल ठोंबरे, महसूल अधिकारी, फलटण (जि. सातारा ) यांची इंदापूर (जि. पुणे ) येथे निवासी नायब तहसीलदार पदी बदली करण्यात आली आहे. एस.सी.वाकसे, निवडणूक नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, यांची मंगळवेढा (जि. सोलापूर) येथे उपविभागीय कार्यालयात बदली झाली आहे. पी.के.कोळी, निवडणूक नायब तहसीलदार, दक्षिण सोलापूर यांची पंढरपूर (जि. सोलापूर) तहसील कार्यालयात बदली झाली आहे.
संजय सदाशिव विभूते, नायब तहसीलदार, उपविभागीय कार्यालय जत यांची नायब नायब तहसीलदार, अनधिकृत बिनशेती (जि. सांगली) येथे बदली झाली आहे.  आर.पी.तोडकर, नायब तहसीलदार आटपाडी यांची मिरज (जि. सांगली) येथे महसूल नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे. यू.एन.होनराव, निवडणूक नायब तहसीलदार कडेगाव (जि. सांगली) यांची नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे बदली झाली आहे. सुरेश गायकवाड, निवासी नायब तहसीलदार, मोहोळ (जि. सोलापूर) यांची सोलापूर अ धा.वि.अ परिमंडळ ड, येथे बदली झाली आहे. संजय गोपाळ शिंदे, नायब तहसीलदार, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे  यांची महसूल नायब तहसीलदार खेड (जि. पुणे) येथे बदली करण्यात आली आहे.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test