दौंड प्रतिनिधी राहुल आवचर
दौंड महसूल विभागाच्या वतीने हिंगणी बेर्डी ,शिरापूर येथीलभीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या १२यांत्रिक बोटी गुरुवारी नष्ट करण्यात आल्या सदरची कारवाई दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडळ अधिकारी सुनील जाधव तसेच दौंड,पाटस,वरवंड आणि रावणगाव मंडळातील तलाठी यांनी आज रोजी मलठण, हिंगणीबेर्डी येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या८ फायबर व ४ सेक्शन असे एकूण १२ यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्या.
भीमा नदी पात्रात खुले आम अवैध वाळू उपसा सुरू आहे, वारंवार अशी कारवाई केली जाते पण हा वाळू उपसा तात्पुरता बंद होतो आणि लगेच पुन्हा हा उपसा सुरू केला जातो, त्यामुळे हा वाळू उपसा कायमस्वरूपी कसा बंद करता येईल याची अंमलबजावणी महसूल विभागाने करावी अशी मागणी परिसरातील सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत, परिसरात सध्या अष्टविनायक मार्गाचे काम चालू आहे, बऱ्याच जागेवर एकेरी वाहतूक सुरू आहे परिसरातील साखर कारखाने चालू झाल्याने या मार्गावरुन उस वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे, उस वाहतूक वेगळी आणि वाळू वाहतूक वेगळी यामुळे परिसरात सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठित धरून प्रवास करावा लागत आहे.



