Type Here to Get Search Results !

एकतीस वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या


दौंड प्रतिनिधी राहुल आवचर  

4 नोव्हेंबर 202 देऊळगाव राजे येथे एकतीस वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून  आत्महत्या केली.
        सदर घटनेची खबर पोलीस पाटील सचिन पोळ यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिली आहे. मयत महिलेचे नाव नकुशा मनीष आमरण वय. 31 रा. देऊळगाव राजे ता. दौंड आहे. मयत महिलेने सकाळी 10 च्या दरम्यान गावशेजारील एक विहरित उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण वि. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, नारायण वलेकर, श्रीधर शिंदे,अण्णासाहेब देशमुख,अमोल गवळी, असिफ शेख, पांडुरंग थोरात,अमोल देवकाते, यांनी भेट दिली.
            मयत महिलेचा पती, सासू सासरे यांना ताब्यात घेतले असून मयताचा भाऊप्रवीण अनिल शेलार सावडी ता. करमाळा जि. सोलापूर व शवविच्छेदन अहवालानुसार गुन्हा धाकल करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test