Type Here to Get Search Results !

बारामती उपविभागात १० महिन्यात ६८ लाख २० हजार ७५८ रुपये किमतीचा गांजा जप्त....

 
बारामती प्रतिनिधी

बारामती उपविभागातील अवैद्य व्यवसायाला आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी सातत्यपूर्ण कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे उपविभागात अवैद्य व्यवसाय ब-याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. गावठी हातभट्टी, गांजा, जुगार, गुटखा अशा अवैद्य व्यवसायांना त्रासलेल्या नागरिकांकडून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत असून त्यांचे आभार मानले जात आहेत.
 
मागील दहा महिन्यात जानेवारी ते ऑक्टोबर अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६८ लाख २० हजार ७५८ किमतीचा गांजा जप्त केला आहे.  या कारवाईत २१ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बारामती उपविभागातील बारामती शहर, बारामती तालुका, इंदापूर, वालचंदनगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीत ८ गुन्हे दाखल असून २१ आरोपींविरोधात मादक औषध व सायको ट्राफिक कायद्यान्वये सदर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी बारामतीचा पदभार स्वीकारला तेव्हापासूनच त्यांनी उपविभागातील बारामती, इंदापूर येथील गुन्हेगारी व अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
 ................................
 बारामती उपविभागातील अवैद्य व्यवसाय व गुन्हेगारी मोडीत काढण्याची कारवाई सुरू आहे. अवैद्य व्यावसायिकांवर तडीपार व मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
 
नारायण शिरगावकर- ( उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती.)

 
बारामती उपविभागात जानेवारी ते आँक्टोबर अखेर दाखल एनडीपीएस गुन्ह्यांची माहिती

अ.नं   
पोलिस ठाणे कलम, आरोपी संख्या, मुद्देमाल
१ बारामती शहर मादक औषध व सायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम १० ब)२७,१८५,३४०२
१५८२०
२) इंदापूर मादक औषध व सायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम २० ब) ०२३७६००
३) बारामती शहरमादक औषध व सायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम २० ब)०३ ७५१००
४)  इंदापूर मादक औषध व सायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम २० ब)०२ ६५५०००
५) बारामती तालुका मादक औषध व सायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम २० ब)०४ ५६९३२२०
६) वालचंदनगर मादक औषध व सायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम २० ब) ०५ ३११७४८
७) बारामती शहर मादक औषध वसायकोट्राँपिक कायदा १९८५ चे कलम २० ब),८ क) ii ब)०१ १२२००
 
८) बारामती शहर मादक औषध व कायदा १९८५ चे कलम २० ब),८ क) ii ब)  ०२ २००००
-           
उपविभाग -२१ ६८२०७५८
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test