Type Here to Get Search Results !

रेडणी येथे आंबा कलमे बांधणी व फळबाग व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न


कळंब/ इंदापूर प्रतिनिधी शहाजीराजे भोसले 

समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा, अंतर्गत रेडणी तालुका इंदापूर येथे ग्रामीण कृषी जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आंबा कलम   बांधणी, फळबागांचे व्यवस्थापन आणि त्यांची काळजी, व फळझाडे लागवडीसाठी नियोजित आराखडा खोली लांबी व रुंदी यावर प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .या पार्श्वभूमीवर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश हरिचंद्र काळे ,यांनी येथील शेतकरी यांच्या शेतात जाऊन वरील विषयांवर प्रात्यक्षिके सादर करून त्यावर मार्गदर्शन केले.सदर प्रात्यक्षिक सादर करीत असताना आंबा कलम बांधणी करून दाखवले. आंबा कोई कलम करून त्यापासून दर्जेदार रोपे व चांगल्या प्रकारे एकूण उत्पन्न मिळते. कलम केल्यानंतर कलम केलेला भाग हा मातीच्या वर 5 सेंटीमीटर वर रहावा या  या कोई  कलम  बांधण्यासाठी जून ते जुलै हा कालावधी योग्य असतो.त्याच प्रकारे फळबागांचे व फुलझाडांचे व्यवस्थापन तसेच त्यांची काळजी आणि सोबतच झाडांची कापणी छाटणी व  त्यापासून होणारे फायदे सांगण्यात आले .त्यानंतर फळझाडे लागवडीसाठी खड्ड्यांचा आकार आवश्यक खोली ,लांबी- रुंदी इत्यादी गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रात्यक्षिकांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. राजपूत सर प्राचार्य. नितीन मेहेत्रे सर व प्रा. राजेश भोयार सर ,यांचे योग्य मार्गदर्शन लाभले.
    यावेळी कृषिदूत गणेश हरिचंद्र काळे आणि शेतकरी सचिन तरंगे सर, रणजीत तरंगे ,विठ्ठल काळे राहुल तरंगे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test