Type Here to Get Search Results !

बारामती उपप्रादेशिक कार्यालयातील सीसी टिव्ही यंत्रणा बंद..


बारामती प्रतिनिधी

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सीसी टीव्ही यंत्रणा गायप झाली असल्याने कार्यालयात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्णयान्वये राज्याचे परिवहन उपआयुक्त जितेंद्र पाटील यांनी लेखी अध्यादेश काढून राज्यातील विविध परिवहन कार्यालयातील बाह्यस्रोतद्वारे पुरवण्यात आलेले कंत्राटी कर्मचारी यांची सेवा संपुष्टात आली असल्याचे लेखी आदेश देऊनही बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनधिकृत व्यक्तीचा सर्रास पणे वावऱ चालू असल्याने राज्याचे परिवहन आयुक्त यांनी देखील नुकताच लेखी आदेश काढला असून त्यांनी देखील आपल्या आदेशमध्ये स्पष्टपणे आदेशीत केले आहे की,परिवहन कार्यालयात अनधिकृत व्यक्तीचा वावर दिसून येतो.वास्तविक परिवहन कार्यालय हे सार्वजनिक कार्यालय (Public Office) आहे.कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त नागरिक/अभ्यागत व त्यांचे प्रतिनिधी त्यांच्या कामकाजसाठी येत असतात. परिवहन कार्यालयामध्ये अनधिकृत व्यक्तीस येण्यास मज्जाव करण्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालयाने संदर्भाधिन परिपत्रकांन्वये वारंवार लेखी सुचना दिलेल्या आहेत.कार्यालयातील जो कक्ष/विभागामध्ये प्रवेश करण्यास कार्यालयीन अधिकारी/कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अनधिकृत व्यक्तिस प्रवेश करण्यास प्रतिबंध करावा.कार्यालयाच्या सर्व कक्ष/विभागामध्ये सीसी टीव्ही यंत्रणा बसवून, सदर यंत्रणा नियमितपणे कार्यान्वित राहतील याची जबाबदारी घ्यावी. व शासकीय वेळेत कामकाज चालू करुण कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सर्वतोपरी सहकारी व मार्गदर्शन करुण त्यांचे काम विहित वेळेत विनासयास पार पाडण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी योग्य ती दक्षता घ्यावी.असे परिवहन आयुक्त यांचे लेखी आदेश असूनही नागरिकांना काही अडचणी आल्यास व त्याबाबत सदर काम होण्यासाठी समंधित अधिकारी यांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केल्या तर तक्रारदारास बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील समंधित अधिकारी ३५३ च्या खोटया पोलीस केस करण्याच्या धमक्या सुद्धा देतात. व खोट्या केसेस दाखल सुद्धा करतात. असे नागरिक सांगतात.
     त्यामुळेच राज्याचे परिवहन आयुक्त यांचे लेखी आदेश असूनही बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयतील सीसी टीव्ही यंत्रणा बंद करण्यात आल्याचे नागरिक सांगतात. महाराष्ट्र राज्यात कोठेही नाही अशा भव्य दिव्य बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निर्मिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे. मात्र त्याच्याच मतदार संघातील बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात, सीसी टीव्ही यंत्रणा चालू नसल्याने नागरिक आश्यर्य व्यक्त करीत आहेत.तसेच बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व कक्ष/विभागामध्ये सीसी टीव्ही यंत्रणा बसवणे अत्यावश्यक आहे. जेणे करून खरोखरच एखादा नागरिक काहीही कारण नसताना कार्यालयात येऊन अधिकारी व कर्मचारी यांना नाहक त्रास देत असेल तर त्याच्यावर रितसर ३५३ चा गुन्हा हा दाखल होणे अनिवार्य आहे. परंतु काहीही कारण नसताना आपल्या अधिकाराचा गैरवपर/दूरउपयोग करून ३५३ च्या खोट्या केस दाखल करण्याच्या धमक्या देऊ नये. अशी मागणी नागरिक करत आहेत. व याबाबातची तक्रारही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर तक्रारींची उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ दखल घेऊन समंधित अधिकारी यांना समक्ष बोलावून याबाबतच्या योग्य त्या सुचना दिल्या आहेत. तरी सुद्धा परिस्थिति जैसी तीच आहे.
       बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एवढ्या मोठ्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक कार्यालयात ज्याची निर्मिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे.त्या बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यांच्या काक्षात तसेच,कर्मचारी यांच्या विभागात,व पब्लिकसाठी असणाऱ्या पब्लिक पँसेजमध्ये सीसी टीव्ही यंत्रणा बसवणे अत्यावश्यक आहे.
      बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यांच्या कक्षात व कर्मचारी यांच्या विभागात सीसी टीव्ही यंत्रणा बसवल्यास राज्याचे परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार कार्यालयातील कक्ष/विभागमध्ये अधिकारी/कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त कोण अनधिकृत व्यक्ति घुसून सरकार जमा झालेली सरकारी कागदपत्र आपल्या ताब्यात घेऊन शासकीय संगणकावर अनधिकृत पणे काम करीत आहे का ? हे सुद्धा या सीसी टीव्ही मुळे स्पष्ट होईल अशी मागणी नागरिक करीत असून एवढ्या मोठया कार्यालयात सीसी टीव्ही बसवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी समंधित अधिकारी यांना आदेश द्यावेत अशी मागणी नागरिक करीत आहेत.

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्या दोन वर्ष्यापूर्वी काही साहित्य चोरी झाली तसेच दिनांक १७/११/२०१८ रोजी कार्यालयीन वेळ सकाळी चालू होताच १०,३० ते ११ वाजेचे दरम्यान तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार अज्ञात हल्ले खोरांनी एका प्रतिनिधिवर अचानक जिवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी सुद्धा बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सीसी टीव्ही यंत्रणा का ? कार्यान्वीत नव्हती.त्यावेळी सीसी टीव्ही यंत्रणा चालू असती तर कार्यालयात  झालेली चोरी व शासकीय कार्यालयात सकाळ सकाळी केलेल्या हल्लेखोरांना पकडने सोपे झाले असते. एवढ्या मोठ्या घटना शासकीय कार्यालयात घडूनही अद्याप पर्यन्त सीसी टीव्ही यंत्रणा का चालु केली जात नाही. या बाबत नागरिकांमध्ये सांशकता निर्माण झाली असून आशर्य व्यक्त केले जात आहे.

*****************************************

सध्या कार्यालयातील सीसी टीव्ही यंत्रणा निधि/ग्रैंड नसल्यामुळे बंद आहे. सीसी टीव्ही यंत्रणेचा डीबीआर दुरुस्ती साठी दिला आहे.साधःरणता एक महीना भरात सीसी टीव्ही यंत्रणा चालू करुण घेऊ
संजय धायगुडे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test