शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनखाली, युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवासेना बारामती लोकसभा विस्तारक राज कुलकर्णी व युवासेना जिल्हा युवा अधिकारी राहूल शिंदे यांच्या सूचनेनुसार स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत पात्र लाभार्थींनी प्रस्ताव ग्रामपंचायत कडे सादर करून बरेच महिने उलटून देखील शौचालय पात्र लाभार्थी यांना अनुदान जमा केले नव्हते यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता ही गोष्ट युवासेना जिल्हा चिटणीस सुरज सानप यांच्या निदर्शनास येताच युवा सेनेच्या वतीने दिनांक 16 10 2020 रोजी मौजे लाखेवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक सो यांना निवेदन दिले यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस सुरज सानप, विभाग युवा अधिकारी अक्षय पवार, माऊली भोसले उपतालुका युवा अधिकारी,अखिल भारतीय पत्रकार संघ सदस्य जमीर सय्यद व इतर युवासैनिक उपस्थित होते, यानंतर इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्याशी सदर विषयाबाबत चर्चा केली. मा गटविकास अधिकारी सो यांनी देखील सदर विषयाची तात्काळ दखल घेऊन दिनांक 21 10 2020 रोजी स्वच्छ भारत अंतर्गत शौचालयाचे धनादेश ग्रामपंचायत लाखेवाडी यांच्या नावे मा ग्रामसेवक सो यांच्याकडे दिले. तसेच सदर धनादेश ग्रामपंचायतच्या खात्यावर लवकर जमा व्हावे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांचे संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर धनादेश लवकर वर्ग करणे साठी चर्चा केली असता त्यांनी देखील सदर विषयाबाबत दखल घेऊन सदर रक्कम ग्रामपंचायत कडे वर्ग केली नंतर ग्रामपंचायतने सदर रक्कम पात्र लाभार्थींनालाभार्थींच्या खात्यावर जमा केली यामुळे ग्रामपंचायत लाखेवाडी व ग्रामस्थ यांनी युवासेनेचे आभार मानले.
युवासेनेकडून स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यासाठी केलेल्या पाठपुरावाला यश
November 07, 2020
0
Tags



