फोटो ओळी : वाखारी गावात डिझेल चोरी झालेले टेम्पो वाहन.
केडगाव प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील केडगाव वाखारी परिसरात व्यवसायिक वाहनातून डिझेल चोरी होण्याच्या घटना वाढत आहेत व्यवसाय करण्यासाठी घेतलेली वाहने घरासमोर उभी केल्यानंतर सदर प्रकार होत आहेत.
असाच प्रकार दि. 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा ते पहाटे साडे तीन वाजण्याच्या दरम्यान वाखारी गावच्या हद्दीत घडला आहे या ठिकाणी असणाऱ्या अक्षय स्पन पाईप कारखान्याच्या आवारात टेम्पो नंबर एम एच 42 _4020 आणि टेम्पो नंबर एम एच 42 _ 2040 या दोन्ही व्यवसाय करणाऱ्या वाहनातून एकूण 116 लीटर डिझेल ज्याची अंदाजे किंमत 8830 रुपये असुन ते कोणीतरी आदन्यात चोरटय़ाने लबाडीच्या इरादयाने आदन्यात चोराने चोरुन नेले आहे याबाबत शिवाजी भरत भापकर यांनी फिर्याद दिली असुन आदन्यात चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे भापकर यांच्या म्हणण्यानुसार हे चोरटे चोरी करण्यासाठी तीन चार मोठ्या वाहनांचा वापर करीत असुन यामध्ये इनोव्हा इंडिका व इतर वाहनांचा समावेश आहे.
फोटो ओळी : वाखारी गावात डिझेल चोरी झालेले टेम्पो वाहन.



