सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवड नुकतीच करण्यांत आली , सरपंच दत्तात्रय तानाजी शेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दि ०९ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली त्यावेळी सर्वानुमते विकास विलासराव पवार यांचे एक मताने व बिनविरोध निवड झाली , माजी उपसरपंच अर्चना संतोष मासाळ यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने व रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर विकास विलासराव पवार यांची निवड करण्यात आली,
या प्रसंगी नवनाथ उद्योगसमूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे, सदस्य ज्ञानदेव कर्चे , विलास पांडुरंग पवार, श्रीपाल सोरटे , ज्ञानदेव सोरटे , विकास केंजळे , सुशांत सोरटे , संभाजी कर्चे , छाया कोरडे , अलका चव्हाण , लंका सोरटे , सुरेश मासाळ , संतोष गोडसे , संतोष घाडगे ,पोलिस पाटील रेश्मा आटोळे , कर्मचारी सागर बांदल , संतोष ननावरे उपस्थित होते, सचिव म्हणून ग्रामसेवक ज्योती काळभोर यांनी कामकाज पाहिले.
निवडी नंतर पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत मिळालेल्या संधीचे नक्कीच सोने करेन सर्वांना सोबत घेत गावचा विकास जास्तीत ज्यास्त कसा करता येईल याचा मी नक्की प्रयत्न करेन .
उपसरपंच - विकास विलासराव पवार



