Type Here to Get Search Results !

आपल्या गाव हद्दीत संशयित कोणी व्यक्ती दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा : ए.पी.आय सोमनाथ लांडे


सोमेश्वरनगर प्रतिनिधी

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 20-25 दिवसापासुन चोर आल्याच्या अफवा सगळीकडे पसरत आहेत. विशेषत: पणदरे दुरक्षेत्र हद्दीतील गावात मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत. 
त्यामुळे लोक जागुन रात्रगस्त करीत आहेत व अनोळखी कोणी दिसला की त्याला चोर समज़ुन पकडत आहेत मारहाण करीत आहेत. 
हा पुर्णत: चुकीचा प्रकार चालला आहे. 
सोनकसवाडी येथे मागचे महिन्यात चोरी केलेले आरोपी पोलिसांनी पकडले आहेत व ते सध्या जेल मध्ये आहेत. रोज पोलीस स्टेशनची मोठी गाडी तसेच सरकारी जीप या दोन्ही पणदरे दुरक्षेत्र व इतर हद्दीत पेट्रोलिंग करत आहेत. तरीही काही  लोक अनोळखी लोकांना पकडुन ठेवत आहेत मारहाण करीत आहेत हे चुकीचे आहे.
यापुढे कोणीही कोणीही खाजगी व्यक्ती रात्रगस्त करणार नाहीत याबाबत स्पष्ट सुचना द्याव्यात. पोलीस , होमगार्ड , पोलीस पाटील हे रात्रगस्त करतील. तसेच खाजगी लोकांनी कोणत्याही संशयित व्यक्तीला पकडु नये अगर मारहाण करु नये . कोठे संशयित व्यक्ती दिसुन आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे सदर ठिकाणी तात्काळ पोलीस पाठवले जातील तसेच संबंधित गावचे पोलीस पाटील ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतील. परंतु कोणीही संशयित इसमाला पकडु नये अगर मारहाण करु नये.

लोकांनी चोर समज़ुन मारल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. व त्यामध्ये गावातील कित्येक लोकांवर मर्डरचे गुन्हे दाखल होवुन त्यांना अटक झाली आहेत.

त्यामुळे कोणीही कोणत्याही संशयित व्यक्तीला पकडु नये किंवा मारहाण करु नये. संशयित कोणी दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test