वाल्हे प्रतिनिधी : सिकंदर नदाफ
पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप यांच्या प्रेरणेतून नुकत्याच पार पडलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वाल्हे येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी अॅड विजय भालेराव विचार मंचातर्फे येथील महर्षी वाल्मिकी विध्यालयात या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा बक्षीस वितरण समारंभ कॉंग्रेसचे प्रवक्ते अॅड विजय भालेराव यांसह आनंदी हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुमित काकडे युवक कॉंग्रसचे राज्य सरचिटणीस गणेश जगताप तालुकाध्यक्ष सागर मोकाशी तसेच प्रा.सचिन दुर्गाडे सामाजिक कार्यकर्ते नाना दाते अशा विविध मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
या स्पर्धेत गुळुंचे येथील जाणता राजा क्रिकेट संघाने प्रथम क्रमांक मिळवत ११ हजार १११ रुपयांचा इनाम पटकावला तर व्दितीय क्रमांकासाठी वाल्हे येथील शिवराय क्रिकेट क्लब ने बाजी मारत ९ हजार ९९९ रुपयांचा इनाम हस्तगत केला असून हरणी येथील गणेश मित्र मंडळाने तृतीय क्रमाक संपादित करून ७ हजार ७७७ रुपयांचा इनाम मिळवला आहे.यावेळी विजेत्या संघाला नानां दाते मित्र परिवाराकडून उत्तेजनार्थ ट्रॉफी देखील देण्यात आल्याने क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रसंगी स्वप्नील बरकडे असलम नदाफ अक्षय भालेराव राहुल पवार आशिष पवार राहुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण कुमठेकर यांनी मानले.