पळशीत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बाजरी बियाणे वाटप
बारामती प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत पळशी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान सन २०२१-२२ पौष्टीक तृणधान्य- बाजरी पीक प्रात्यक्षिकाचे बियाणे सरपंच बाबासाहेब चोरमले व माजी उपसरपंच संगीता गुलदगड यांचे हस्ते शेतकऱ्यांना बांधावर वाटप करण्यात आले.
महाडीबीटी मधून अर्ज केलेल्या शेतकरी गटास १० हेक्टर बाजरी पेरणीसाठी २५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १ एकरसाठी दीड किलो बियाणे वाटप करण्यात आले.
बारामती तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, सुपे मंडल कृषी अधिकारी सुभाष बोराटे, कृषी पर्यवेक्षक सचिन फुले यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
बीबीएफ यंत्राद्वारे बाजरीची पेरणी करावी, त्यासोबत बीबीएफ यंत्राने खत टाकल्यास १० टक्के रासायनिक खताची बचत होते. योग्य प्रमाणात बी व खत पडून ठराविक अंतरावर बाजरी पेरल्यामुळे उगवणक्षमता चांगली होते आणि उत्पादन क्षमतेतही वाढ होते. यावेळी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व बाजरी लागवड तंत्रज्ञान याविषयी कृषी सहाय्यक एस.व्ही. डफळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोळेकर, नवनाथ कोळेकर, सुरेश गुलदगड, काशिनाथ पिंगळे, धनराज माने, रामदास गुलदगड, ईश्वर गुलदगड, हिम्मत गुलदगड, विलास माने, ग्रामसेविका दिपाली हिरवे, बाळू बंडगर, गडदे इ. शेतकरी उपस्थित होते.