देऊळगावराजे ग्रामपंचायतिच्या उपसरपंच पदी बाबू पासलकर यांची बिनविरोध निवड .
देउळगाव राजे प्रतिनिधी
देउळगाव राजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुक्रवारी युवा नेतृत्व बाबू नारायण पासलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली, विद्यमान उपसरपंच सुलोचना शिवाजी तावरे यांनी आपल्या पदाचा राजनामा दिल्याने रिक्त जागेवर पासलकर यांची निवड करण्यात आली, या वेळी सरपंच स्वाती गिरमकर, अमित गिरमकर,नारायण गिरमकर, दादा गिरमकर, दिपक पासलकर, मदन गिरमकर, सागर तनपुरे, भरत आबा गिरमकर, महादेव औताडे, संभाजी माने, आप्पा खेडकर, सचिन पोळ ग्रामसेवक नेपते भाऊसाहेब आदी मान्यवर उपस्तीत होते,आपल्याला मिळालेल्या पदाचा गावच्या सर्वसमावेशक विकासासाठी उपयोग करुण गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भावी काळात प्रामाणिक प्रयन्त केले जातील असे नवनियुक्त उपसरपंच पासलकर यांनी सांगितले.