"श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था" यांच्या वतीने "राष्ट्रवादी कॉंग्रेस" पक्षाचा २२ वा वर्धापन दिन संपन्न तर कोव्हीड योद्ध्यांचा केला सन्मान.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष" चा गुरुवार दि १० जूनला होणारा 22 वा वर्धापन दिन कोरोनाचे सर्व नियम पाळून सोमेश्वर मंदिर कार्यलयात नुकताच साजरा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यांच्या वर्धपान दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप , बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मा सभापती अनिल खलाटे,युवा नेते गौतम काकडे-देशमुख,पत्रकार अँड गणेश आळंदीकर,करंजे मा सरपंच प्रकाश मोकाशी,देवस्थानचे सचिव राहुल भांडवलकर,
खजिनदार बाळासो भांडवलकर,वाकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष अनिल भंडलकर ,प्रतीक्षा जनजणे उपस्थित होते.तर कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता समाज्याचे रक्षण करत , हाताला काम नसलेल्या गरजूंच्या मदतीसाठी त्यांच्या हाकेला धावनारे या कामी ज्यांनी मोलाचे योगदान दिले अश्या या समाज रक्षक "कोव्हीड योद्धे" बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे ,वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,करंजेपूल पोलीस निरीक्षक योगेश शेलार ,चौधरवाडी च्या कन्या सध्या रुई येथे कार्यरत असणाऱ्या आरोग्य अधिकारी ज्योती घोरपडे(पवार) , बारामती प्रभातचे संपादक विनोद गोलांडे,उद्योजक बुवासाहेब हुंबरे ,चौधरवाडी पोलीस पाटील राजकुमार शिंदे ,आश्या वर्कर विनया भांडवलकर,वाकी पोलीस पाटील हनुमंत जगताप, गट समनव्यक सुनील जोशी (गुरुजी) यांना सन्मानपत्र , श्रीफळ -गुलाब पुष्प देत कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच
राष्ट्रवादी वर्धापन दिनाचे औचित्य साधत वाकी , करंजे,देऊळवाडी,चौधरवाडी,माळवाडी,जोशीवाडी,रासकरमळा येथील गरजू कुटुंबियांना श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे व मान्यवरांच्या हस्ते किराणा साहित्यचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमा वेळी अनंत मोकाशी, सोमनाथ देशमुख , संतोष हुंबरे,तानाजी भापकर, प्रतीक्षा झणझणे,नितीन शेंडकर, अमोल फरांदे, अनिल चौधरी ,बाळासाहेब चौधरी, संतोष भांडवलकर,सोमनाथ हुंबरे,पांडू हुंबरे, कुमार जगताप,वाकी ग्रा प सदस्य सुधीर गायकवाड,करंजे तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बनसोडे यांनी केले तर आभार भाऊसाहेब हुंबरे यांनी मानले.
*****************************************
श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कोरोनाच्या काळात आर्सेनिक अम्बम30च्या गोळ्या वाटप, मास्क वाटप, रक्तदान शिबिर व गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच ही संस्था पुढील काळात सुद्धा अशीच समजतील गार्जुना मदत करणार करणार आहे