Type Here to Get Search Results !

माळेगाव येथील जुगार अडुयावर छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्याकडून सुमारे १५ लाखाचा माल जप्त

माळेगाव येथील जुगार अडुयावर छापा टाकून १६ जुगार खेळणाऱ्याकडून सुमारे १५ लाखाचा माल जप्त                                                   



माळेगाव प्रतिनीधी

इंदापूर तालुक्यात नुकतीच जुगार क्लबवर मोठी कारवाई झाली यामध्ये राजकीय व शासकीय कर्मचारी जुगार खेळताना सापडले असतानाच बारामती तालुक्यातील माळेगाव ता.बारामती येथे पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पत्त्याच्या क्लब जुगार अडुयावर छापा टाकून १६ जुगार्यांकडून सुमारे १५ लाखाचा माल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.पुणे जिल्हयाचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली

पथके नेमण्यात आलेली आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल

गोरे,सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय जगताप,विजय माळी, हनुमंत पासलकर, ज्ञानदेव

क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम,सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे, सागर चंद्रशेखर, गुरू गायकवाड, नितीन भोर,अभिजित एकशिंगे, प्रसन्न घाडगे,बाळासाहेब खडके यांचे पथक बारामती विभागात दिनांक १३ मे २०२१ रोजी

पेट्रोलींग करीत असताना, त्यांना माळेगाव खुर्द ता.बारामती गोसावी वस्ती येथे सोमनाथ गव्हाणे यांचे शेतात मोठ्या प्रमाणात जुगार पत्त्यांचा क्लब चालू असल्याची माहिती मिळाली होती.त्याप्रमाणे सदर पथकाने वेशांतर करून

माळेगाव खुर्द ता.बारामती गोसावी वस्ती येथील सोमनाथ सदाशिव गव्हाणे याचे शेतात चालणारे पत्त्याचे क्लबवर सापळा रचून अचानकपणे छापा टाकून तेथे पत्त्याचा जुगार खेळत असताना मिळून आलेले इसम नामे (१) सोमनाथ सदाशिव गव्हाणे वय वर्षे ४२ रा.माळेगाव खुर्द ता.बारामती जि.पुणे (२) रमेश शंकर गायकवाड वय वर्ष ४०

रा.एस.टी.स्टॅड जवळ, बारामती ता.बारामती

जि.पुणे (३) राजु शंकर जोगदंड वय वर्षे ४०

रा.शालीमार चौक, दौंड ता.दौंड जि.पुणे (४)

अनिश विनायक मोरे वय वर्षे ३१ रा.आमराई

बारामती ता.बारामती जि.पुणे (५) संतोष दिनकर रोकडे वय वर्षे ४५ रा.सासपडे ता.जि.सातारा (६) अनिल बाळासाहेब माने वय वर्ष ४५ रा.सासपडे ता.जि.सातारा (७)राजु शंकर गायकवाड वय वर्ष ४० रा.एस.टी.स्टॅड समोर, बारामती ता.बारामती

जि.पुणे (८) कुलदीप बाळासाहेब जगताप

वय वर्षे ३२ रा.सांगवी ता.बारामती जि.पुणे

(९) महादेव आण्णा मासाळ वय वर्षे ५८ रा.मासाळवाडी लोणीभापकर, ता.बारामती

जि.पुणे (१०) श्रीकांत श्रीनिवास उगले वय

वर्षे ३४ रा.सासपडे ता.जि.सातारा (११)

विजय बाबुराव मोरे वय वर्ष ४८ रा.कसबा

बारामती ता.बारामती जि.पुणे (१२) फैयाज

युनुस मुल्ला वय वर्ष ३१ रा.बुधवार पेठ फलटण ता.फलटण जि.सातारा (१३) संतोष किसन शिंदे वय वर्षे ४२ रा.परंदवाडी ता.फलटण जि.सातारा (१४) सुरेश शिवाजी शेलार वय वर्षे ४९ रा.आमराई, बारामती ता.बारामती जि.पुणे (१५) विजय सुरेश देशमुख वय वर्षे १९ रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे (१६) विक्रांत अशोक अवधुते वय वर्षे २४ रा.चंद्रमणी नगर,

बारामती ता.बारामती जि.पुणे यांना ताब्यात

घेतले. तेथे त्यांचेकडे व पत्त्याचे डावात मिळून आलेली १३,९५०/- रुपये रोख रक्कम, १,०१,०००/- रु. चे ११ मोबाईल, एक

स्कार्पिओ, एक इर्टीगा, ४ मोटरसायकल अशी १४,००,०००/- रु. ची वाहने व ७,९००/- रु.चे जुगाराचे साहित्य असा एकूण १५,२२,८५०/- (पंधरा लाख बावीस हजार आठशे पन्नास) रुपये किंमतीचा माल जप्त केलेला आहे. जुगार खेळताना मिळून आलेले १६ आरोपी विरुध्द बारामती तालुका पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे.पुढील अधिक तपास बारामती तालुका

पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण व माळेगाव दूरक्षेत्राचे सहा. पोलीस निरीक्षक एम. एच. विधाते हे करीत आहेत.सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. व बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,पोसई.

अमोल गोरे, सफौ. दत्तात्रय जगताप, विजय माळी, पो.हवा. हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम,

सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे, पो.ना.सागर चंद्रशेखर, गुरू गायकवाड, नितीन भोर, अभिजित एकशिंगे, पोकॉ. प्रसन्न घाडगे,बाळासाहेब खडके यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test