Type Here to Get Search Results !

प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे उद्या पासून दर्शनासाठी खुले -सचिव राहुल भांडवलकर

प्रसिद्ध  श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे उद्या पासून दर्शनासाठी खुले -सचिव राहुल भांडवलकर
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचने’नुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात बंद असलेली धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग व हात धुणे किंवा निर्जंतूकीकरण करणे या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ७ ऑक्टोबर पासून सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी  दिले आहेत.
 
   या अनुषंगाने बारामती तालुक्यातील प्रसिध्द सोरटी समनाथाचे प्रतिरुप मानले जाणारे करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.  भाविकांसाठी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत प्रवेश देणार असून ट्रस्ट कर्मचारीही यावर नेमले आहेत.अशी माहिती देवस्थान ट्रस्ट सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test