मु. सा. काकडे महाविद्यालयात विविध उपक्रमांच्या उदघाटन कार्यक्रम संपन्न
सोमेश्वरनगर प्रतिनिधी,
बारामती तालुक्यातील मु .सा.काकडे महाविद्यालयांमध्ये ऑक्सीजन पार्क, आरोग्य सेवा केंद्र, बॉटनिकल गार्डन, एनसीसी उद्यान, यांचे उद्घाटन झाले याप्रसंगी मुकुट नियतकालिके च्या प्रदर्शनाचे शुक्रवार दि १ रोजी उदघाटन झाले
अध्यक्ष म्हणून व्यवस्थापन समितीचे सचिव प्रा. जयवंत घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत काकडे -देशमुख होते व व्यवस्थापन समितीचे मान्यवर सदस्य, डॉ. सचिन शहा, डॉ गणेश जगताप, हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य जवाहर चौधरी यांनी केले. त्यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने व नॅक च्या पार्श्वभूमीवर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या विविध कामांचा आढावा त्यांनी आपल्या मनोगता मध्ये घेतला.
घोरपडे यांनी महाविद्यालयाच्या उन्नती आणि विकास यांचा आढावा घेऊन नवनवीन उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयात सुरू केलेल्या आरोग्य सेवा केंद्रासाठी डॉ. सचिन शहा व डॉ. गणेश जगताप व मुलींची आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर अलकनंदा जगताप व डॉक्टर स्नेहप्रभा तवटे यांनी वैद्यकीय अघिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. जगताप मॅडम, डॉ.गिरीश तवटे मॅडम, व्यवस्थापन समितीचे सहसचिव सतीशराव लकडे, उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, उपप्राचार्या डॉ. जया कदम,उपप्राचार्य प्रवीण ताटे-देशमुख,उपप्राचार्या मेघा जगताप, व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन शेठ कुलकर्णी, प्रा. महेंद्रसिंह जाधवराव,प्रा. शिवाजीराव शिंदे,संजय घाडगे संकेत जगताप, ऋषिकेश धुमाळ, प्रा.डॉ. देविदास वायदंडे,डॉ.संजू जाधव, प्रा. सौ सुजाता भोईटे उपस्थित होते.
प्राचार्य जवाहर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीयसेवा योजनेचे कार्यक्रमअधिकारी प्रा.अच्युत शिंदे, प्रा.डॉ.दत्तात्रय डुबल, बाळासाहेब मरगजे प्रा.सौ.नांदखिले मॅडम, प्रा. किरण मोरे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए.एस. शिंदे तर आभार डॉ. श्रीकांत घाडगे यांनी मानले





