Type Here to Get Search Results !

वाल्हे येथे क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ

वाल्हे येथे क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
पुरंदर प्रतिनिधी  :वाल्हे येथे शिवराजा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बारामती लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे तसेच शिवसेनेचे युवा नेते सागर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत  पार पडला.
यावेळी जवळपास २५ संघ या क्रिकेट स्पर्धेच्या मैदानात उतरले होते.त्यापैकी मोरया क्रिकेट क्लब ने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला .तर व्दितीय क्रमांकासाठी शिवराजा प्रतिष्ठानची वर्णी लागली असून तृतीय क्रमांकासाठी शिवशक्ती प्रतिष्ठान पात्र ठरले आहे.
या दरम्यान राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कृतीशील अध्यक्ष अजिंक्य भैय्या टेकवडे यांसह शिवसेनेचे युवा नेतृत्व सागर भुजबळ यांच्या हस्ते विजेत्या संघाला अनुक्रमे रोख रकमेचा इनाम व ट्रॉफी बहाल करण्यात आल्याने क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.तर या स्पर्धेसाठी लागणाऱ्या साहित्य सामुग्रीसाठी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले शिवसेनेचे नीरा गण प्रमुख राहुल यादव सामाजिक कार्यकर्ते गोरख कदम यांसह पाटील कॉर्नर केटरर्स ,तन्मय चायनीज कॉर्नर व नाईट टी पाँइटच्या व्यवस्थापकांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
याप्रसंगी स्वाभिमानी पत्रकार गोरख मेमाणे ,सुशांत पवार, आकाश पवार, प्रशांत दाते, नवनाथ पवार, शरद पवार, हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजल पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार ऋतिक पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test