करंजे ! विविध उपक्रमांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथे सोमवार दि १ रोजी रोजी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे १०२ नावे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, जयंती निमित्त सोमेश्वर विद्यालय भाग शाळा करंजे येथे शालेय विद्यार्थ्यांकरीता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ करंजे यांचेकडून पंधरा डझन वह्या चे व सोमनाथ मुरलीधर भांडवलकर यांच्याकडून दहा डझन व यांचे वाटप तसेच सार्थक शैलेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीचे अवचित साधन वाटप करण्यात आले .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे येथे विद्यार्थ्यांकरिता वाटप करण्यात आले कार्यक्रमास करंजे गाव सरपंच जया गायकवाड ,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे साहेब, पी. एस. आय .शेलार साहेब,सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी सरपंच प्रकाश मोकाशी , उपसरपंच बाळासाहेब शिंदे ,पोलीस पाटील राजेश सोनवणे,तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड , सुनील केंजळे , निलेश गायकवाड, वसंत होळकर, अनिल जाधव, काका भंडलकर ,सुखदेव शिंदे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ करंजे सदस्य उपस्थित होते , डोंबाळे सर यांनी अण्णाभाऊंचा जीवनपट उलगडून दाखविला.
उपस्थित मान्यवरांचे आभार पुणे जिल्हा युवक मातंग नवनिर्माण सेना अध्यक्ष सचिन पाटोळे यांनी मानले.