श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग चे हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे श्रावणी सोमवार निमित्त कोरोनाच्या संकटानंतर दोन दोन वर्षांनी सोमेश्वर मंदिर परिसर हजारांच्या संख्येने गजबजला होता तसेच मंदिर परिसरातही मिठाईवाले गृहपयोगी वस्तूंचे दुकाने लहान तोरणा यात्रेचे आकर्षण असणारे विविध प्रकारचे पाळणे ही आलेले आहेत तसेच विविध दुकानांनी मंदिर परिसरात असल्याचे चित्र दिसत होते .
भाविकांची पहिल्या सोमवारी विविध जिल्ह्यातून हजारो शिवभक्त भाविकांनी स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्यामार्फत मंदिर व मंदिर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे
सोमवारी दि १ रोजी मध्यरात्री स्वयंभू शिवलिंग महापूजा सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या पत्नी यांच्या शुभ हस्ते तर बारामती राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत पुरोहित मुकेश भांडवलकर व ऋषिकेश घोलप यांनी केली .
तसेच सोमेश्वर शिवलिंग गाभारा व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सूंदर सजावट निंबुत येथील युवानेते गौतम काकडे-देशमुख यांनी केली ,येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पहिल्या श्रावणी सोमवारचे महाप्रसादाचे नियोजन विक्रम भोसले , गोरख इंगळे तसेच शुभम साळुंखे यांनी केले होते.
महापूजे दरम्यान देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर ,सचिव राहुल भांडवलकर, करंजे सरपंच जया गायकवाड ,करंजेपुल सरपंच वैभव गायकवाड , मोहन भांडवलकर तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील सन्मानित प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य विभाग होळ यांच्यामार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत उपचाराची सोय करण्यात आली होती तसेच वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे तसेच करंजेपूल दूरक्षेत्रचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . सोमेश्वर ट्रस्टच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले अशी माहिती देवस्थान विश्वस्त योगेश भांडवलकर यांनी दिली तसेच श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजे येणाऱ्या सर्व भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे यंदाची श्रावण यात्रा ही सर्व सोमेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ, पंचक्रोशीतील सन्मानित सदस्य एकत्रितपणे तसेच सर्व मंडळात नेमलेले मूळ करंजेतील पाच गावचे सरपंच यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे खजिनदार सोमनाथ भांडवलकर यांनी माहिती दिली.



