धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दिक्षाभूमीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी द्यावी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई - येत्या अशोक विजय दशमी दिनी 67 व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनी आंबेडकरी अनुयायी बौद्धांच्या नागपूर दिक्षाभूमीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्यात यावी अशी आंबेडकरी जनतेतून मोठया प्रमाणात मागणी होत आहे.या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन दिक्षाभूमीला जाणाऱ्या आंबेडकरी बौद्ध अनुयायांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात यावी या मागणी चे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना देणार आहोत अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.