Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी रो. अरविंद गरगटे तर सचिवपदी रो. रविकिरण खरतोडे यांची निवड....

रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी रो. अरविंद गरगटे तर सचिवपदी रो. रविकिरण खरतोडे यांची निवड....
रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षपदी रो. अरविंद गरगटे तर सचिवपदी रो. रविकिरण खरतोडे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कौटुंबिक कार्यक्रमात रो. अरविंद गरगटे, रो. रविकिरण खारतोडे यांनी मावळत्या अध्यक्षा रो. दर्शना गुजर आणि मावळते सचिव रो. अभिजित बर्गे यांचेकडून पदभार स्वीकारला.
पदग्रहण समारंभचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो. शीतल शहा, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे सहाय्यक प्रांतपाल रो. राकेश गानबोटे,रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीचे संचालक रो. वसंतराव मालुंजकर,मेंबरशिप समितीचे विभागीय संचालक रो. अनिल शितोळे, फाउंडेशन चे विभागीय संचालक रो. नरेंद्र गांधी, भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. संतोष सवाने, इंदापूर सेंट्रल रोटरीचे अध्यक्ष रो. ज्ञानदेव डोंबाळे, दौंड रोटरीचे अध्यक्ष रो. दिपक सोनवणे, सराटी रोटरी चे अध्यक्ष रो. संदीप कदम, सहाय्यक प्रांतपाल रो. दत्ता बोराडे आदी मान्यवर आणि बारामती रोटरी क्लबचे सर्व सदस्य आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते.
पदग्रहण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो. शीतल शहा म्हणाले की,समाजाप्रती आपले कर्तव्य जबादारीने पार पाडण्याचे काम रोटरी अत्यंत प्रभावीपणे करीत असते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्थापन झालेल्या रोटरीने जगभरात दोनशे पेक्षा अधिक देशात आपले काम उभे केले आहे. जगात 24x7 रोटरीचे काम सुरु असते. चोवीस तास जगात कुठे ना कुठे रोटरी सदस्य काम करीत असतात. समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडताना रोटरी सदस्य आपल्या खिशातून पैसे खर्च करतात त्याचबरोबर आपला वेळ आणि कौशल्य देत असतात.सुरुवातीला सुमारे 75 वर्ष आंतरराष्ट्रीय रोटरी मध्ये महिलांचा नव्हता मात्र 1984-85 मध्ये आंतरराष्ट्रीय रोटरीने आपल्या नियमात बदल करून महिलांना सदस्य करून घेण्याची सुरुवात केली,आज यांचा फायदा होऊन मोठया प्रमाणात महिला सदस्यांची संख्या वाढली आहे. महिला सदस्यांच्या वाढीव संख्येमुळे रोटरीचे काम गावागावात तळापर्यंत  पोहचत आहे. आजपर्यंत रोटरी सदस्य सामाजिक काम आपल्या खिशातून पैसे खर्च करून करीत आहेत मात्र आगामी काळात आपल्याला रोटरीच्या कामात समाजातील विविध घटकांना सहभागी करून घ्यावेच लागेल.
यावेळी प्रांतपाल रो. शीतल शहा यांच्या हस्ते बारामती रोटरी क्लबचे जे सदस्य रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या विविध समित्यांवर काम करणाऱ्या 14 सदस्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ज्या सदस्यांनी रोटरी इंडिया फाउंडेशनला देणगी दिली त्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब जगताप, यश संघवी आणि शीतल कोठारी, यांना रोटरी सदस्यत्वाची पिन प्रदान करण्यात येऊन बारामती रोटरी क्लबचे सदस्य करून घेण्यात आले. बारामती रोटरी क्लबच्या मावळत्या अध्यक्षा रो. दर्शना गुजर आपल्या अध्यक्षपदाच्या काळातील कामाचा आढावा घेतला. मावळते सचिव रो. अभिजित बर्गे, सहाय्यक प्रांतपाल रो. राकेश गानबोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रोटरी वर्ष 24-25 चे अध्यक्ष रो. अरविंद गरगटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या कार्यकाळात आपण प्रांतपाल यांच्या स्वप्नातील सुपर अकरा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले त्याचबरोबर बारामती रोटरी च्या वतीने सुमारे दहा हजार झाडांची लागवड करणार असल्याची खात्री अरविंद गरगटे यांनी दिली.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांचे आभार रोटरी सचिव रो. रविकिरण खारतोडे यांनी मानले तर सूत्रसंचालन रो. प्रा. डॉ. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले.
रोटरी वर्ष 2024-25 ची कार्यकारिणी.....
अध्यक्ष -रो. अरविंद गरगटे
सचिव - रो. रविकिरण खारतोडे,
रो. शिवदास गुजरे, रो. सचिन चावरे, रो. पार्शवेंद्र फरसोले, रो. कौशल सराफ, रो. दत्ता बोराडे, रो. अलीअसगर बारामतीवाला, रो. प्रा. प्रवीण ताटे देशमुख, रो. हर्षवर्धन पाटील, रो. प्रतीक दोशी, रो. प्रा. डॉ. अजय दरेकर,रो. ऍड.अक्षय महाडिक, रो. अभिजित बर्गे, रो. दर्शना गुजर, रो.सदाशिव पाटील

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test