'सोमेश्वर'भागात बाजरी काढणी व मळणीची लगबग
सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यात सध्या बाजरी पिकाच्या काढणीत शेतकरी व्यस्त आहेत. बारामतीतील पश्चिम भागात बाजरीचे पीक काढणीस आले असून, सततच्या वातावरणातील बदलामुळे बाजरीची काढणी व मळणी करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. यावर्षी सर्वत्र पाऊस अधिकचा असल्याने बारामतीतील पश्चिम भागात विविध वाणांचे बाजरी पीक मोठ्या प्रमाणात क्षेत्र पाहायला मिळते पीकही जोमात आलेली आहेत सोमेश्वरनगर येथे श्री सोमेश्वर साखर कारखाना असल्यामुळे हा ऊस बागायत पट्टा जरी असला तरी तरकारी पिकांकडे युवावर्ग वळलेला दिसत आहे . सध्या शेतकरी बाजरी हे पीक काढणी व मळणी यामध्ये व्यस्त दिसत आहे . मजुरांचा तुटवडा जाणवत असला तरी अधिक ची रक्कम देत मजूर उपलब्ध करून बाजरी पीक काढणी व मळणी करत आहे.
____________________________________
३४५ या वाहनाची बाजरी केली असून यावर्षी पाऊस काळ चांगला असल्याने बाजरी पीक जोमात आले आहे .चांगले उत्पन्न मिळणार आहे, शेतातील मजुरांचा तुटवडा होता अधिकची रक्कम देत मजूर उपलब्ध केले.
शेतकरी सुनील भोईटे...