गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी 'सोमेश्वर' बाजारपेठ फुलली
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुख्य बाजरपेठ परीसरात शनिवारी श्री गणेशाचे आगमन होणार असल्याने दोन दिवस अगोदरच सोमेश्वर मुख्य करंजेपुल येथील मुख्य बाजारपेठ गणेश मूर्ती विक्रेत्यांमुळे फुललेली दिसत होती , यावर्षी अधिकचां पाऊस काळ असल्यामुळे शेतात तरकारी पिकांसह बाजरी ऊस चांगलेच भरलेले आहे त्यामुळे बळीराजा सुखावलेला असल्यामुळे यंदा गणेश मूर्ती व गौरी गणपती आरास साठी मनसोक्त खरेदी करताना दिसत होते तसेच मूर्ती खरेदी करण्यासठी वाघळवाडी, करंजेपूल,करंजे, मगरवाडी, सोरटेवाडी, देऊळवाडी, रासकरमळा, चौधरीवाडी, करंजेपूल येथील सोमेश्वरनगर ही मुख्य बाजारपेठ असल्याने येथे गणेश मूर्ती घेण्यासाठी येत असतात .
दरवर्षीपेक्षा यावर्षी गणेशमूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलचे प्रमाण ज्यास्तीचे असल्याने सोमेश्वरनगर येथील करंजेपुल बाजारपेठ मोठ्या संख्येने गजबाजली होती .
बाजारपेठेत आलेल्या मुर्त्यांमध्ये लालबागचाराजा ,दगडूशेठ व विविध आसनावरील श्री गणेशाच्या मूर्तींची घरगुती साठी मागणी बाजारपेठेत दिसत आहे .डायमंड मूर्तीचे आकर्षण असल्याने ग्राहकांची वड या मूर्ती खरेदी करण्याकडे आहे .
_____________________________________________
या वर्षी श्रीगणेशाच्या मूर्ती दोनशे रुपयांपासून ते सहा ते सात हजार हजारापर्यंत बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. यावर्षी पावसाळा चांगला असल्याने गणेश मूर्ती खरेदी करताना शेतकरी नागरिक समाधानी होते.
--- व्यापारी संजय कुंभार, करंजे सोमेश्वरनगर ---