Type Here to Get Search Results !

योग दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान मध्ये मुलांना मिळाला निरोगी आरोग्याचा मंत्र

योग दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान मध्ये मुलांना मिळाला निरोगी आरोग्याचा मंत्र 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज सीबीएसई वाघळवाडी येथे जागतिक योग दिनाचे औचित्य साधत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध आसनांची व योग मुद्रांची प्रात्यक्षिके केली. 
यावेळी प्रांजली बनकर या प्रशिक्षित योगा शिक्षिकेचे मुलांना मार्गदर्शन लाभले. मुलांचे उत्तम व निरोगी शारीरिक विकास तसेच चित्त एकाग्र करणारी सोपी आसने मुलांकडून करवून घेतली. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये मुलांना योग विद्या त्याचे फायदे समजावून सांगितले 
शाळेतील शिक्षिका कामिनी भुंजे यांनी ओमकार व योगसाधनेचे महत्त्व थोडक्यात सांगत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. 
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमात सहभाग घेतला. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक उर्मिला मचाले व रणजीत देशमुख यांनी बहुमूल्य योगदान दिले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test